#HBD_Jeetendra...
हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांना ‘Jumping Jack’ या टोपणनावाने ओळखले जाते, ती व्यक्ती म्हणजे रवी अमरनाथ कपूर ऊर्फ प्रसिद्ध अभिनेते जीतेंद्र...
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत २००हून अधिक चित्रपटांमधून नायक आणि सहनायकाच्या भूमिकेत जीतेंद्र प्रेक्षकांसमोर आले. १९६४ साली प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित “गीत गाया पत्थरों ने” या चित्रपटातून एक नायक म्हणून जीतेंद्र यांचे रुपेरी पडद्यावर पहिले पाऊल पडले. त्याआधी १९५९ साली प्रदर्शित झालेल्या “नवरंग” या चित्रपटात, अभिनेत्री संध्या यांचा duplicate म्हणून त्यांना संधी मिळाली होती...
यशासाठी झगडत असलेल्या जीतेंद्र यांना प्रसिद्धी मिळाली, १९६७ साली प्रदर्शित झालेल्या “फर्ज” या चित्रपटामुळे. “फर्ज”मध्ये त्यांनी परिधान केलेले पांढरे बूट आणि टी-शर्ट पुढे अनेक वर्ष ‘Fashion Symbol’ म्हणून ओळखले गेले. अभिनेते जीतेंद्र यांच्या सुरुवातीच्या काही चित्रपटांत जसे “कारवाँ”, “हमजोली”, “परिवार”, “सुहाग रात”, अनेक उडत्या चालींवरची गाणी होती. जेव्हा त्यांना ‘Jumping Jack’ हे टोपण नाव मिळाले...
त्या काळातल्या अनेक यशस्वी दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी आवृत्तींमध्ये जीतेंद्र नायक म्हणून प्रेक्षकांसोर आले. “औलाद”, “कठपुतली”, “रूप तेरा मस्ताना”, “बिदाई”, “हिम्मतवाला”, “तोहफा”, “उधार का सिंदूर”, “संजोग”, “जुदाई”, “मांग भरो सजना” अशा अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्यांमध्ये जीतेंद्र दिसले. अभिनेत्री जयाप्रदा, रेखा आणि श्रीदेवी यांच्यासोबत जीतेंद्रची पडद्यावरची जोडी प्रेक्षकांनी खूप पसंत केली...
दाक्षिणात्य चित्रपटांशिवाय, “परिचय”, “खुशबू”, “किनारा”, “दिलदार” अशा वेगळ्या कथानक असलेल्या चित्रपटांमधूनही अभिनय करत जीतेंद्र लोकप्रिय होत गेले. एक नायक म्हणून यश संपादन करत असताना, "नागिन", "जानी दुश्मन", "कर्मयोगी", "खिलौना", "द बर्निंग ट्रेन" अशा चित्रपटांमधून सहनायक किंवा सहअभिनेता म्हणूनही जीतेंद्र झळकले. "बदले की आग", "पापी देवता", "दोस्ती दुश्मनी", "शेशनाग", "भूकंप", "सोने पे सुहागा" अशा मसाला चित्रपटांत प्रेक्षकांसमोर येत असताना मात्र जीतेंद्र यांची लोकप्रियता कमी होत गेली...
१९९०च्या काळात मग जीतेंद्र यांनी चरित्र भूमिकांकडे मोर्चा वळवला. “यह रात फिर ना आएगी”, “दिल आशना है”, “प्रतीक्षा”, “खलनायिका”, “उधार की जिंदगी”, “महानता”, “चुप”, “ख़ुदगर्ज़” अशा चित्रपटांमधून चरित्र भूमिका करत जीतेंद्र पुन्हा लोकप्रियतेच्या मार्गाला लागले. रुपेरी पडद्यावर प्रचंड यशस्वी होत असताना, जीतेंद्र यांनी त्यांच्या मुलीच्या म्हणजे एकता कपूर यांच्या काही मालिकांमधून विशेष भूमिका करून छोट्या पडद्यावर तर हात आजमावलाच, पण आणि सध्या ते OTTवरही दोन वेब सीरिजमध्ये दिसत आहेत...
जीतेंद्र आणि शोभा कपूर यांची प्रेम कहाणीसुद्धा एखाद्या चित्रपटासारखीच होती. जीतेंद्र आणि शोभा कपूर यांची भेट झाली तेव्हा शोभा कपूर १४ वर्षांच्या होत्या. काळ पुढे जात राहिला तसं त्याचं प्रेमही बहरत गेलं. १९७४ साली “बिदाई” या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या प्रेमी युगुलाने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबद्दल एक किस्सा खूप लोकप्रिय आहे. जीतेंद्र यांना शूटिंगसाठी जायचं होतं. फ्लाईट रद्द झाल्याने ते घरी परतले. शोभा कपूर यांनी त्यांना त्या दिवशी परत जाऊ दिलं नाही. ती फ्लाईट क्रॅश झाली होती आणि शोभा कपूर यांच्या प्रेमानेच जीतेंद्र यांना वाचवलं असं म्हणतात...
आज जन्म ७ एप्रिल. अभिनेते जीतेंद्र यांचा वाढदिवस. चित्रपटसृष्टीच्या या 'Jumping Jack'ला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...
बार बार दिन यह आये... बार बार दिल यह गाये...
तू जिये हज़ारों साल यह हम सब की है आरज़ू...
Happy birthday to you...
Happy birthday to you...
Happy birthday to ओ जीतू...
Happy birthday to you...
@ अनिकेत परशुराम आपटे.
.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment