मंडळी पुनर्जनम म्हणजे मराठी re-incarnation, यावर अनेक शिणुमे बनले. त्यातलाच येक म्हन्जी "क"च्या बाराखडीतला, "करन-अर्जून..."
एक आटपाट नगर असतंय. तिथे दुर्जनसिंह (पुरींचा अमरीश) नावाचा राक्षस असतोय. इश्टेटीसाठी दुर्जनसिंह दुर्गाच्या (गुल्ज़ारांची राखी) दोन्ही कार्ट्यांना म्हणजे करनला (खानांचा सलमान) आणि अर्जूनला (खानांचा शाह रुख) मारून टाकतोय. पण करन आणि अर्जूनने रिटर्न तिकीट काढलेलं असतंय. त्यांचं बुकिंग अजय आणि विजय या नावाने झालेलं असतंय...
करन-अर्जून हाणामारीच्या बाबतीत कंडम पण अजय-विजय मात्र लय पावरबाज. वाट्टेल तेव्हा तंगड्या उडवत जाम भारी मारामारी करत असतात. तिथे गावात, ग्रामोफोनची पिन जशी अडकते, तशी दुर्गाबाईची सुई, "मेरे करन-अर्जून आएँगे..." या वाक्यावर अडकलेली असते. एक दिवस अजय-विजयचं कातडं पांघरलेले करन-अर्जून गावात येतात आणि दुर्जनसिंहची हवा टाईट होते. शेवटी लय भन्नाट हाणामारी होते आणि अजय झालेल्या करनकडून व विजय झालेल्या अर्जूनकडून दुर्जनकाका गोळ्या खाऊन टपकून जातात...
चला पिच्चर संपला. आता पिच्चरचे चारेक्टर...
दुर्जनसिंह...
हा प्राणी आक्क्या पिच्चरमध्ये म्हातारा होत नाही. करन-अर्जूनला मारतानाही त्याच्या मिशा आणि केस काळे असतात. आणि अजय-विजयकडून मार खाऊन मरतानाही ते काळेच असतात. बहुतेक दुर्जनकाका गोद्रेज हेयर डाय लावत असावेत...
दुर्गादेवी...
या काकूचं नक्की वय काय असावं... म्हणजे करन-अर्जून मरतात तेव्हा ही काकू शीनियरमंडळीत जमा होण्याच्या मार्गावर असते. जवळ-जवळ २०-२२ वर्षांनी रिटर्नच्या पासावर अजय-विजय परत येतात. तेव्हा या काकू खरंतर सुरकुतलेल्या थोबाडाच्या आजी दिसायला हव्यात. पण त्यांचं वय थोडंसंच वाढलेलं वाटतं. एकतर त्यांचा बालविवाह झाला असावा किंवा त्यांचा सीन नसेल तेव्हा त्या फेयर एँड लव्हली किंवा संतूर वापरत असाव्यात...
विजय किंवा अर्जूनची स्मरणशक्ती दाखवणारा चुड़ीवाला...
आपण एखाद्या दुकानदाराकडून एखादी गोष्ट विकत घेतल्यावर त्या दुकानदाराचा चेहेरा आपल्या लक्षात राहील न राहील. पण इथे अर्जून ज्या चुड़ीवाल्या चाचाकडून चुड़ियाँ विकत घेतो, २०-२२ वर्षांनंतरही त्या चाचाला बरोब्बर ओळखतो. हा विजय बहुदा बदाम खात मोठा झाला असावा...
या तीन चारेक्टरशिवाय मुनीमजी नावाचं येक चारेक्टर आहे जे दोन रुपयांचा हफ्ता मागत असतं आणि करन-अर्जून त्याला शेंडी लावतात. ते चारेक्टर त्या शेंडीमुळे बहुदा इतकं शरमलं, की तलावातल्या त्या चुल्लूभर पाण्यातच लपून राहिलं असावं. कारण नंतर ते परत आलंच नाही...
फिल्लममधल्या हिरवीनपैकी कुलकर्णींच्या ममताला जास्तच फुटेज मिळालं बरं का... म्हणजे, "इक मुंड़ा मेरी उम्र का..." या रोमांचिक गाण्यात हिरूसमोर, "भंगड़ा पा ले..." या फ्यामिली गाण्यात सासूसमोर, "गुपचूप गुपचूप गुपचूप गुपचूप..." या आयटम गाण्यात सावत्र चुलत सासरा व व्हिलनसोबत आणि "जय माँ काली..." या भक्ती गाण्यात दुज्जा हिरवीनसोबत नाचण्याचा चानस मिळाला. हे पाहून देवगणांच्या काजोलला किती वाईट वाटलं असेल ना...
माझ्या काही शंका पण आहेत बरं का...
वीस-बावीस वर्षात एखाद्या जागेत, तिथल्या गल्ल्यांमध्ये थोडेफार फरक होतात. करन-अर्जून जेव्हा बागडतात तेव्हाची घरं, घरांवरची कौलं, फुलबाग, भिंतींमधून दिसणाऱ्या विटा, हे सगळं जसंच्या तसं विजयला कस्स्काय दिसतं बौ...
सोनियाला दुर्जनसिंह काका आणि त्यांचा व्हॉट ए जोकवाला पोरगा, जबरदस्तीने किंड्याप करून हवेलीवर नेतात. तेव्हा सोनिया रस्ते पाहत नाही. हवेलीतून सटकल्यावर ती डायरेक्ट विजयकडे कशी काय येते... शीक्रेटली गूगल म्याप तर नाही ना चालवलं...
"जय माँ... काली..." या भक्तीगीताच्या यंडिंगला दुर्जनकाकांला करन-अर्जून दिसतात आणि त्याचवेळी सक्सेनाला अजय-विजय दिसतात... येकाच वेली दोन मानसं आनी कापडं पन चेंजली... डोस्क्यावरून ग्येलं बौ...
हे दोन्ही खान भाऊ येकत्र येण्याची पण येक मजा आहे बरं का... आदी ह्यो शिणुमा राहुलवाला खानांचा शाह रुख आणि सिंघमवाला देवगणांचा अजय करणार होता. पण अजयला करायचा होता अर्जून (बायको सोबत रोमांचिक गाणं मिळालं असतं ना...) आणि शाह रुखला करायचा होता करन (का म्हणजे... आहो ममता ताई होती ना करनची हिरवीन... ) पण आपला हृतिकचा पप्पू लय हुशार बगा. त्याने शक्कल लढवली आणि खान भाऊसाहेबांची वर्णी लागली... (कोणाला सांगू नका बरं... नायतर तो सिंघम आणि मैं हूँ ना... दोघं पण धोपटतील मला...)
तर, बाकी काही असो, पण या शिणुमाच्या आशिटण असलेल्या पडद्याबाहेरच्या क्रिशच्या पडद्याबाहेरच्या वडूंनी भारीच पिच्चर बनवल्यानीत... नाही का...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment