एखाद्या घटनेचा मनावर झालेला परिणाम आणि त्याचे उमटलेले पडसाद, यावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे, मिलिंद मुक्तेश्वर आपटे दिग्दर्शित, "केस नं. ७३..."
एकामागून एक असे चार खून होतात. खुनाची पद्धत आणि वापरलेलं हत्यार, यावरून हे सिरीयल किलिंगचं प्रकरण आहे या निष्कर्षापर्यंत एस.पी. संजय देशमुख (शैलेश दातार) येऊन पोहोचतात. केस सोडवण्यात होणाऱ्या विलंबामुळे खुन्याची मानसिकता समजून घेऊन त्याला पकडण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून एस.पी. देशमुख, त्यांच्या मित्राची म्हणजेच डॉ. श्रीकांतची (अशोक शिंदे) मदत घेतात. खुन्याला शोधण्यात एस.पी. संजय यांना यश येईल का...?? काय आहे केस नं. ७३..?? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात समजतात...
कथानक भूतकाळ आणि वर्तमानकाळ असं घडत जातं. चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेली एक घटना त्यावेळी भूतकाळातली नसते. पण जसा चित्रपट पुढे जातो तसं आपल्याला समजतं की ती घटना कथेच्या भूतकाळापैकी एक असते. चित्रपटाचा पूर्वार्ध बऱ्यापैकी ताणला गेल्यासारखा वाटतो. कौटुंबिक घडामोडी, प्रेम-द्वंद्व गीत, यांच्यावर जास्त भर दिल्यासारखा दिसतो. त्यामुळे मुख्य कथाभाग थोडा झाकोळून जातो. चित्रपटात एकच कथनकाच्या दोन बाजू दिसतात. पूर्वार्धातला कथाभाग हा element of thrill घेऊन येतो आणि surprising note वर संपतो. उत्तरार्धातला कथाभाग, त्याच thrill ला emotional touch जोडतो आणि neutral end वर संपतो. पण चित्रपट संपताना मात्र पुन्हा एकदा thrill element समोर ठेवतच संपतो...
चित्रपटात काही नवख्या आणि काही अनुभवी कलावंतांचा भरणा आहे. नवखे कलावंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेले नाहीत. पण शैलेश दातार, अशोक शिंदे आणि नंदिता पाटकर या अनुभवी कलावंतांनी अदाकरीची बाजू उचलून धरली आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळ असा प्रवास करणारं कथानक थोडं कमकुवत वाटतं. पण एका गंभीर विषयाकडे हे कथानक बोट दाखवतं. त्या विषयाला दोन वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चित्रपटात असलेली गाणी चित्रपटाला बऱ्याच अंशी off track नेतात, पण पुन्हा कथा रुळावर येते...
एकंदरीत, एकाच विषयासाठी thrill आणि emotions अशा दोन्ही गोष्टी दर्शवणारा मिलिंद मुक्तेश्वर आपटे लिखित, "केस नं. ७३" हा चित्रपट one time watch पाठडीत मोडणारा आहे...
@ अनिकेत परशुराम आपटे.






