मराठी-हिंदी
चित्रपटांत आजवर आपण अनेक गाणी पाहिली आणि ऐकली. एखाद्या डिस्कोमध्ये, घरामध्ये,
रस्त्यावर,
गुंडांच्या
अड्ड्यांवर गाणी चित्रित झालेली आपण पाहतोच. पण काही गाणी अशी असतात ज्यात एखाद्या
वाहनाचा उपयोग केला जातो. यातली काही मराठी-हिंदी गाणी आपण पाहू...
विमान...
विमान प्रवासात
सहसा गाणी नसून,
एखादं साहस दृष्य किंवा विनोदी दृष्य असतं. गाणी असलीच तर ती dream
sequence
मध्ये असू शकतात. माझ्या लक्षात असलेली दोन गाणी म्हणजे,
"
पुष्पक विमान" या चित्रपटातलं, "
आनंदाचे
डोही..." हे गाणं. चित्रपटात एकदम शेवटी येणाऱ्या या गाण्यात,
तुकोबांच्या
पुष्पक विमानात बसण्याचं स्वप्न उराशी बाळगून मोठ्या झालेल्या विठ्ठल भक्त
आजोबांना,
त्यांचा पहिला आणि शेवटचा विमान प्रवास पार करण्यासाठी स्वत:
पांडुरंगच मदत करतो असा सुंदर विचार या गाण्यात मांडलेला दिसतो...
तसंच दुसरं गाणं
आहे, "
विवाह" चित्रपटातलं "हमारी शादी में..." छान उडत्या
चालीवरच्या या गाण्यात,
आपल्या होणाऱ्या बायकोला भेटण्यासाठी आतूर झालेल्या नायकाला सगळीकडे
नायिकाच दिसते. मग त्यातून कशा गमती घडतात हे दिसतं. दोन्हीही गाण्यांचं संगीत
वेगळं,
भाषाही वेगळी,
पण आकाशात ढगांमधून जाणारं विमान आणि
विमानाचा आवाज,
या दोन गोष्टी समान होत्या...
ट्रेन...
गाण्यात जेव्हा
ट्रेन दाखवली जाते,
तेव्हा ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या किंवा आठवणींना उजाळा देणाऱ्या
व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तींबद्दल दाखवलं जातं. "माझं घर माझा संसार" या
चित्रपटातलं, "
दृष्ट लागण्याजोगे सारे..." हे गाणं असो किंवा
"अजनबी" या चित्रपटातलं, "
हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़
चले..." हे गाणं असो, "
दोस्त" चित्रपटातलं "गाड़ी
बुला रही है..." हे गाणं असो किंवा "प्लॅन" या चित्रपटातलं
"आनेवाला पल वो आ रहा है..." हे गाणं असो,
प्रत्येक गाण्यात
काही ना काहीतरी कथानक दडलेलं आहे...
गाण्यात
दाखवल्या गेलेल्या ट्रेनच्या दृष्यांची तीन गाणी माझ्या मते थोडी वेगळी होती.
"दिल से" या चित्रपटातलं, "
छैय्या छैय्या..." या गाण्याचा
मुख्य चित्रपटाशी काहीही संबंध नव्हता. संपूर्ण चित्रपट गंभीर स्वरूपाचा असल्याने
आणि बहुतांश गाणीही तशीच असल्याने,
या आयटम साँगचा समावेष करण्यात आला
असावा. तसंच, "
जब प्यार किसीसे होता है" या चित्रपटातलं, "
जब
प्यार किसीसे होता है..." आणि "आराधना" या चित्रपटातलं,
"
मेरे सपनों की रानी" ही दोन्हीही गाणी एकाच पद्धतीची आहेत ज्यात
नायक ट्रेनच्या बाहेरून ट्रेनमध्ये असणाऱ्या नायिकेला मोहित करण्याचा प्रयत्न
करतो...
बस...
गाण्यात जेव्हा
बसचा समावेष केला जातो,
तेव्हा धावता निसर्ग,
खिडकीतून दिसणारी दृष्य,
हे
ओघाने येतंच. अशा प्रकारच्या गाण्यांच्या संगीतात,
गाण्याच्या
सुरुवातीला किंवा मध्ये,
आवर्जून बसच्या हॉर्नचा वापर केलेला
दिसतो. नायक किंवा नायिकेसोबत चित्रपटातील इतर कलावंतांनाही साथ संगत म्हणजेच
कोरसची संधी मिळते. "बॉम्बे टू गोवा" या चित्रपटातलं, "
यह
है प्यार का सफर..." आणि "देखा ना हाय रे सोचा ना...",
"
नवरा माझा नवसाचा" या चित्रपटातलं, "
हिरवा निसर्ग हा
भवतीने...", "
अंदाज़ अपना अपना" या चित्रपटातलं, "
दो मस्ताने चले
ज़िंदगी बनाने..." किंवा "हम साथ साथ हैं" चित्रपटातलं,
"
ए बी सी डी ई एफ जी एच आय...",
अशा उडत्या
चालीवरच्या गाण्यात आपल्याला बस आढळते...
"
शान"
चित्रपटातलं, "
जानू मेरी जान..." हे गाणं मात्र थोडं वेगळं आहे. बसचा हॉर्न
आणि बस प्रवासाच्या लईवर बसवलेलं संगीत तर आहेच. पण वेगळेपणा असा,
की
या गाण्यात फक्त चारच कलावंत आहेत. शिवाय यात कोरसचाही वापर केलेला दिसत नाही.
तिसरी गोष्ट अशी,
की इतर गाण्यांच्या तुलनेत,
हे गाणं थोडंसं पॅचवर्कसारखं वाटतं. हे
गाणं तिथे आलं नसतं तरी चाललं असतं. पण मसाला चित्रपटांचा एक भाग असतो
नायक-नायिकेचं द्वंद्व गीत. या चित्रपटात तसा पर्याय कुठे नसल्याने हे गाणं असं
मध्येच घुसवलं गेलं असावं...
ट्रक...
ट्रकचा वापर
ज्या गाण्यात केला गेला आहे,
तिथे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी
एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचण्यासाठी नायक-नायिका निघाले आहेत असा कथाभाग
दिसतो. "गदर" या चित्रपटातलं, "
मुसाफिर
जानेवाले...", "
दिल" या चित्रपटातलं,
"
हमने घर छोड़ा है..." अशा गाण्यांचा समावेश आहे. याला अपवाद
म्हणजे, "
गाईड़" या चित्रपटातलं, "
आज फिर जीने की
तमन्ना है..." हे गाणं,
ज्यात पाश तोडू पाहणाऱ्या एका
मुलीबद्दल सांगितलं आहे...
गाण्यात एकाच
पद्धतीचं संगीत आहे असं नाही. शिवाय अशा गाण्यात काही गोष्टी समान आहेत. त्या
म्हणजे गाणी सुरू होतात ट्रकने पण ट्रकवर संपत नाहीत. शिवाय ट्रकचा वापर गाण्यात
काही काळच आहे...
घोडा / टांगा...
टांगा किंवा
घोडा गाडी ज्या ज्या गाण्यात वापरली गेली,
ती गाणी बहुत करून रोमँटिक पठडीतली
होती. "तुमसा नहीं देखा" या चित्रपटातलं, "
तुमसा नहीं
देखा..." हे गाणं असो किंवा "नया दौर" या चित्रपटातलं,
"
माँग के साथ तुम्हारा..." हे गाणं असो, "
निश्चय"
या चित्रपटातलं, "
चल मेरे घोड़े चल चल चल..." किंवा "अंदाज़ अपना अपना"
या चित्रपटातलं, "
एल्लो जी सनम हम आ गए..." हे गाणं असो,
सर्वात
हलकी-फुलकी नोक-झोक आणि रोमँस दाखवला गेला आहे...
या गाण्यांना
अपवाद ठरलं ते "मराठा तितुका मेळवावा" या चित्रपटातलं, "
शूर
आम्ही सरदार..." हे गाणं. संदेश पोहोचवण्याच्या कामी नेमणूक झालेला
महाराजांचा एक सरदार,
आपलं आणि इतर सर्व सरदारांचं गुणगान गात वाटचाल करतो आहे असं कथानक
गाण्यात दिसतं. या सर्व गाण्यात एक गोष्ट समान आहे. ती गोष्ट म्हणजे घोड्यांच्या
टापांच्या लईशी जुळणारं संगीत या सर्व गाण्यात आपल्याला ऐकू येतं...
चार चाकी /
दुचाकी...
चार चाकी किंवा
दुचाकी वाहनं जेव्हा चित्रपटांच्या गाण्यात असतात,
तेव्हा त्या
गाण्याच्या चित्रिकरणात,
एक,
दोन किंवा चार
कलावंतांचा बहुत करून समावेश असतो. मुख्यत्वे नायक किंवा नायिका अशा गाण्यात
आपल्याला दिसतात. "दिवार" चित्रपटातलं, "
कह दूँ तुम्हें
या चुप रहूँ...", "
साजन" चित्रपटातलं, "
तुम
से मिलने की तमन्ना है...", "झुक गया
आसमान" या चित्रपटातलं,
"
कौन है जो सपनों में आया...", "
मेरे सनम"
या चित्रपटातलं, "
पुकारता चला हूँ मैं...", "
एक गाडी बाकी
अनाडी" चित्रपटातलं, "
नाचुया गाउया खेळुया
वाऱ्यासवे..." अशा काही गाण्यात बिना टपाची आणि दारांची जीप किंवा कार या चार
चाकी वाहनाला दाखवलं गेलं आहे...
दुचाकी
वाहनांमध्ये सहसा बाईक,
म्हणजे मोटर सायकलचा वापर जास्त दिसतो. "काला पत्थर"
चित्रपटातलं, "
एक रास्ता है ज़िंदगी जो थम गए तो कुछ नहीं...", "
मुकद्दर
का सिक़ंदर" चित्रपटातलं, "
रोते हुए आते हैं सब...",
"
दिवाना" चित्रपटातलं, "
कोई ना कोई
चाहिए प्यार करनेवाला..." "धडाकेबाज" चित्रपटातलं, "
ही
दोस्ती तुटायची नाय...", "
शोले" चित्रपटातलं, "
ये
दोस्ती हम नहीं तोड़ेंगे..." अशा काही गाण्यांमध्ये आपल्याला बाईकवर स्वार
मनमौजी नायक पहायला मिळतात. अशा गाण्यात बाईक्स जास्त दिसतात. स्कूटरचा वापर सहसा
दिसत नाही. शिवाय दुचाकी असो वा चार चाकी,
गाणं संपताना long shot
घेऊन
पुढे जाणारं वाहन दाखवलं जातं...
इतर वाहनं...
विमान,
ट्रेन,
बस,
यांच्याखेरीज
अजूनही वाहनं आहेत जी गाण्यात वापरली गेली. "पड़ोसन" चित्रपटातलं,
"
मैं चली मैं चली...",
ज्यात सायकलवर स्वार नायिका समोर येते.
"गम्मत जम्मत" चित्रपटातलं, "
मी आले
निघाले" हे गाणं ज्यात बोटीवर मैत्रिणींसोबत विहार करणारी नायिका आपल्याला
दिसते. ",
चार चाकी अपंगांच्या गाडीवर फिरताना, "
आते जाते हुए
मैं सब पे नज़र रखता हूँ..." हे गाणं म्हणणारा एक तरूण "शान" या
चित्रपटात आपल्याला दिसतो. "सीता और गीता" या चित्रपटात, "
ओ
साथी चल..." हे प्रेम द्वंद्वगीत म्हणत स्वच्छंद विहार करणारी नायक-नायिकेची
जोडी समोर येते...
चालत्या
वाहनांवरचं चित्रिकरण तितकं सोपं नसतं. आधीच्या जमान्यात वाहन उभं करून त्याच्या
बाजूला हलत्या चित्रांचा पडदा लावला जायचा आणि त्या पडद्यासमोर वाहनाच्या आतल्या
कलावंतांवर गाण्याचं चित्रिकरण केलं जायचं. त्यानंतर त्याच वाहनाला long
shots
आणि sky shots
वापरून,
वेगवेगळ्या angle
ने
शूट करून प्रत्यक्ष प्रवास करताना दाखवलं जायचं. काळ पुढे गेला आणि काही गाण्यात
प्रत्यक्ष चालत्या वाहनांवर चित्रिकरण सुरू झालं...
दिग्दर्शकाच्या
मेहनतीचा थोडाही वाटा कमी न करता मला सांगावसं वाटतं,
की अशावेळी खरं
कसब पणाला लागतं ते कॅमेरामन आणि कलावंतांचं. कॅमेरा स्टिल ठेऊन ते हलतं चित्रिकरण
करण्यात कॅमेरामनचं कौशल्य दिसून येतं. अवघडलेल्या जागी उभू राहून,
किंवा
बसून किंवा एखादी dance step
करत स्वत:ला सांभाळत त्या गाण्यासाठी
लागणारे हावभाव सादर करताना कलावंतांनाही तारेवरची कसरत करावी लागते. सर्वांच्या
एकत्रित मेहनतीचं फळ म्हणजे ते गाणं,
जे एखाद्या वाहनाला सोबत घेऊन पडद्यावर
दिसतं...
वेगवेगळ्या
धाटणीची,
वेगवेगळं संगीत वापरून वेगवेगळ्या वाहनावर चित्रित झालेली ही
प्रवासात्मक गाणी,
पडद्यावर तर छान दिसतातच,
पण सतत गुणगुणावीशीही वाटतात...
@
अनिकेत
परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment